विठू माउली तू माउली जगाची Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics

विठू माउली तू माउली जगाची Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics | Marathi Bhakti Git | Marathi Old Songs Lyrics | Marathi Vitthachi Gani

Vithu Mauli Tu Mauli Jagachi Is A Marathi Bhakti Git From Are Sansar Sansar Movie And Song Sung By Anil-Arun And Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics In Marathi Provided By MarathitLyrics.


विठू माउली तू माउली जगाची Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics
Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics 

Song Credits:

चित्रपट: अरे संसार संसार

संगीत: अनिल अरुण

गायक: सुधीर फडके, जयवंत कुळकर्णी, सुरेश वाडकर


विठू माउली तू माउली जगाची Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics 

 

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची

विठ्ठला मायबापा

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची. ||1||


काय तुझी माया सांगू श्रीरंगा 

संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा

डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा

अमृताची गोडी आज आलिया अभंगा

विठ्ठला पांडुरंगा

अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची

विठ्ठला मायबापा

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची ||2||

लेकरांची सेवा केलीस तू आई

कस पांग फेडू कस होऊ उतराई

तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई

ओवाळीन जीव माझा सावळे विठाई

विठ्ठला मायबापा

जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची

विठ्ठला मायबापा

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची ||3||


पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची ||4||

Vithu Mauli Tu Mauli Jagachi 

Blogger द्वारे प्रायोजित.